प्रमुख कार्ये व जबाबदाऱ्या
मदत कार्ये
- तात्काळ मानवतावादी सहाय्यासाठी संसाधनांची जुळवणी करणे.
- मदत शिबिरे आणि तात्पुरती निवारा स्थळे स्थापित करणे आणि व्यवस्थापित करणे.
- अत्यावश्यक पुरवठ्याचे (अन्न, पाणी, औषधे) वितरण समन्वयित करणे.
- प्रभावित कुटुंबांना आर्थिक सहाय्य पुरविणे.
पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती
- विविध विकास प्रकल्पांतर्गत प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सुनिश्चित करणे.
- प्रकल्प बाधित भागांत उपजीविकेच्या साधनांची व आर्थिक स्थैर्याची पुनर्प्राप्ती करणे.
- सन १९७६ च्या पूर्वीच्या पुनर्वसित वसाहतींना नागरी सुविधा पुरवणे.
- प्रकल्पग्रस्त व्यक्तींना राज्य पुनर्वसन अधिनियम १९७६, १९८६, १९९९ च्या तरतुदी प्रमाणे पर्यायी जमिनींचे वाटपाचे संनियंत्रण करणे व १९७६ पुर्वीच्या प्रकरणांकरिता उच्चाधिकार समिती द्वारे संनियंत्रण करणे.